लातूरमध्ये लाॅकडाऊन ही अफवा-जिल्हाधिकारी

Latur Collector

लातूर : जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे लॉकडाउन जाहीर झालेले नाही. लॉकडाऊन विषयी समाज माध्यमावर व्हायरल होत असलेले संदेश फेक आहेत. लातूरमध्ये कोणत्याही प्रकारचे लॉकडाउन जाहीर झालेले नाहीत, तेव्हा लातूरकरांनो काळजी करण्याचे काही कारण नाही, या आशयाचे टि्वट जिल्हाधिकारी बी. एस. पृथ्वीराज यांनी केले आहे.

राज्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. या पार्श्वभुमिवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. यानुसार शहर व जिल्ह्यात कोरोना नियमाचा भंग करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. यात प्रामुख्याने खासगी कोचिंग क्लासेस आणि मंगल कार्यालयावर प्रशासनाचे लक्ष आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी क्लासेस आणि मंगल कार्यालयासोबत संयुक्त बैठक घेऊन त्यांना कोरोना नियम सक्तिने पाळण्याचे आवाहन केले होते.

या दरम्यान राज्यात काही शहरात लॉकडाऊन जाहीर झाले. याच पार्श्वभूमिवर लातूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाउन लागू झाले आहे असा संदेश समाज माध्यमावर फिरत होता. यावर जिल्हाधीकारी बी. एस. पृथ्वीराज यांनी स्वत: टि्वट करुन नागरिकांना आश्वस्त केले की चिंता करण्याचे काही कारण नाही. शहर व जिल्ह्यात लॉकडाऊन लागु झालेले नाही. चिंतेचे कारण नसावे अशा आशयाचे टि्वट त्यांनी केले. यादरम्यान रविवारी कोरोनाचे ४४ नवे रुग्ण समोर आहे आसून, एकूण ३४६ सक्रिय रुग्ण आहे.

महत्वाच्या बातम्या