अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाउन आणखी शिथिल; दुकाने खुली ठेवण्याबाबत नवी नियमावली

lockdawon

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन आणखी शिथिल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आहे. १५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील ग्रंथालय, आठवडे बाजार, जनावरांचे बाजार, उद्याने सुरू करण्यासोबत दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहणार आहेत.

दुकानांची वेळ याआधी ७ पर्यंत होती. राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातही दुकानांची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी काढला आहे. शाळा, महाविद्यालये, जीम मात्र ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत.

मिशन बिगीन अंतर्गत राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातही दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे. याआधी फिरण्यावर रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत बंदी होती. त्यातही एक तास ढील देण्यात आली असून रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

यासह आठवडे बाजार, जनावरांचा बाजार सुरू होणार आहे. रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी सामाजिक अंतर पाळण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. यासह नागरिकांनी गरज असल्यास घराच्या बाहेर पडावे, शक्यतो घरूनच काम करावीत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदच राहणार आहे. यासह खासगी आणि शासकीय ग्रंथालय हे सुरू करण्यास परवागी देण्यात आली असून गार्डन, उद्यान आणि सार्वजनिक मोकळ्या जागा करमणुकीसाठी खुली करण्यात आली आहेत. प्रतिबंधात्मक भागातील शाळांमध्ये ५० टक्के शिक्षकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी असून त्यांना ऑनलाईन शिक्षण देता येणार आहे. असे असले तरी शाळा, महाविद्यालये, जीमला मात्र बंदीच आहे.

महत्वाच्या बातम्या:-