बारामतीतही आता पुन्हा वाढवला लॉकडाऊन

blank

बारामती: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांचा आकडा हा चिंताजनक असल्याने या दोन्ही शहरांसह आजुबाजुच्या परिसरात देखील आजपासून कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. यातच काही दिवसांत ‘कोरोना मुक्त’ झालेल्या बारामतीमध्ये देखील आता कोरोनाचा प्रसार वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

बुधवार १५ जुलैपासून पुढील आदेश येई पर्यंत बारामतीत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रविवारी बारामतीमध्ये एकाच दिवशी तब्बल १८ रुग्ण आढळून आले होते. तर, नागरिकांसह प्रशासनाची चिंता परत वाढली होती. यातच, बाधितांच्या संपर्कात असणाऱ्यांची करोना चाचणी घेतली असता आज पुन्हा नव्याने ५ करोना बाधितांची भर पडली आहे. बारामतीत दोन दिवसात २३  कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुढील काही दिवस बारामती पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

#Corona: कोरोनाची लागण झाल्याने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

त्यामुळे १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून नगरपालिका हद्दीतील सर्व क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.  गुरुवार (दि. १६) पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा डोकेवर काढू लागलेल्या या कोरोनाला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनानेतर्फे पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे.

सत्य परेशान हो सकता है लेकिन…!सचिन पायलटांचे सूचक विधान

तर, पुण्यात एकीकडे रस्ते निर्मनुष्य झालेत आणि दुसऱ्या बाजूला नागरीकांचा रस्त्यावर अक्षरशः लोंढा आलाय. अशी विरोधात्मक परिस्थिती असताना कोरोनाची साखळी ब्रेक कशी होईल, असा प्रश्न उपस्थित होतोय. तर या लॉकडाऊनमध्ये आयटी कंपन्या, एमआयडीसीतील कंपन्या या सुरु असणार आहेत. दरम्यान, “कंपन्यांच्या एचआर विभाग प्रमुखाने कंपनीच्या लेटरहेडवर वाहन परवाना द्यावा. या परवान्यांची माहिती एचआरने संबंधित पोलीस आयुक्त आणि पोलीस स्टेशन प्रभारी यांना द्यावी. कामगार-अधिकाऱ्यांनी कंपनीने दिलेला वाहन परवाना सोबत ठेवणे बंधनकारक असेल”, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.

‘बिग बी व अभिषेकच्या डिस्चार्ज देण्याबाबत नानावटी रुग्णालयाने दिली ‘ही’ माहिती