Breaking : देशात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला

lockdown

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिकट बनत चालल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो तीन मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात आला.

कोरोनाचे संकट पाहता पाचव्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो,सिनेमा गृह हे बंद राहणार आहेत. राजकीय,समाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहणार आहेत.बाकी सर्व नियम आता आहेत तसेच राहणार आहेत.दरम्यान,या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे.येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.