पाचव्या लॉकडाऊनची लवकरच घोषणा होणार ? राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

sharad pawar and udhav thackeray

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा रविवारी ३१ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन वाढवणार का? किंवा यात काही शिथिलता आणून सूट देण्यात येईल यावर चर्चा सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर ४था लॉकडाउनचा कालावधी संपत असताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रेड झोन क्षेत्रात जास्त प्रमाणात दिलासा मिळावा तसंच रेड झोनशिवाय इतर भागात सध्या पेक्षा जास्त शिथिलता आणावी, अशी मागणी केली आहे.

असं वृत्त news18लोकमत ने दिलं आहे. याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल पुणे येथे बोलताना चौथा लॉकडाउन संपल्यानंतर रेड झोन क्षेत्रात आणखी अटी शिथिल कराव्यात अशी भूमिका मांडली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांसी संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ला सुरुवात होईल. ३१ मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा संपत अल्याने नरेंद्र मोदी नेमकी काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत गृहमंत्र्यांसमोर आपली मतं मांडली. तसेच बहुतेक मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी आणखी १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली असल्याने १ जूनपासून लॉकडानचा पाचवा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.