लॉकडाऊन : कुणी करतंय स्वयंपाक, तर कुणी पाहतंय गाणी… तुम्ही यातली कोणती गोष्ट करताय ?

नुपूर कुलकर्णी/औरंगाबाद : कोव्हीड-१९ संसर्गावर मात करण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला या लॉकडाऊनच्या काळात घरी काय करावं असा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय ? लॉकडाऊन मजेशीर बनिविण्यासाठी घरात राहूनच काय करता येईल याचा शोध अनेकांकडून घेतला जात आहे.

काय काय करताय बर तुम्ही? काही जण निवांत तीन टाइम जेवण आणि झोपण्यात वेळ घालवत आहे तर काही पती आपल्या घरच्या गृहमंत्र्यांना म्हणजे पत्नीला घरचे काम करण्यात मदत करत आहेत आणि सोबतच स्वयंपाक बनवायला देखील शिकत आहेत. मग या स्वयंपाकाच्या प्रयोगामध्ये या पती परमेश्वराची कशी धांदल उडती आहे ते आपण सोशल मीडियावर बघितलं असेलच.

युवा मंडळी काय करताय बर? अर्थात सोशल मीडिया, मुव्हीज, गेमिंग, वेबसिरीज आणि विशेष म्हणजे व्हाट्सऐप स्टेटस आणि इंस्टाग्राम स्टोरीज वर सुरु असलेली साडी कॉन्टेस्ट, विदाउट मेकअप चॅलेन्जे, स्लॅम बुक, आस्क मी एनिथिंक सारखं बरंच काही करत आहेत आणि हो या मध्ये ‘तू मला असा प्रश्न विचार म्हणजे मी तीच नाव घेतो आणि टॅग करतो वाले पण मागे नाहीत’ ते हि जोमात सुरु आहे.

काही महाशय टिकटॉक वर मजेशीर व्हिडीओ बनवत आहेत तर काही घराबाहेर निघण्याचा प्रयत्न करून महाप्रसादाचा लाभही घेऊन आलेत त्याचे व्हिडीओ सुद्धा पाहत आहेत. या सोबतच काही मंडळी आप-आपल्या परीने लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत.

महत्वाचं म्हणजे घरातील आई काय करते आहे बरं ? अर्थात ती काय करणार जस बाहेर कोरोनाशी लढा देण्यासाठी डॉंक्टर, पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा झटतीये त्याच प्रमाणे आपला पती, मुलगा, मुलगी घरातील वृद्ध असे सर्व पहिल्यांदाच एकत्र असल्याने त्यांचं घरात मन रमावं म्हणून सतत त्यांना काहींना काही नवीन-नवीन पदार्थ बनवून खाऊ घालत आहे. तर कोणी घरातून बाहेर जाऊ नये, सगळ्यांनी सतत हात धूत राहावे या कडेही तिचेच लक्ष आहे. अशा या माउलीला एकही दिवसाची सुट्टी नाही. या व्यतिरिक्त राहिलेली वृद्ध मंडळी व छोटे मुलं कोणी कार्टून बघताय तर वृद्ध रामायण, महाभारत बघत हा लॉकडाऊनचा वेळ घालवत आहे.