मोबाईलवरुन लोकलचे तिकीट काढता येणार

मुंबई : लोकलचे तिकीट आता घरबसल्या मोबाईलवरुन काढता येणे शक्य झाले आहे. प्रवाशांची गौरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘ UTS हे अॅप तयार केले आहे. त्यामुळे प्रवाशांना घाईच्या वेळात तिकीटासाठी रांगेमध्ये ताटकळत उभे राहण्याची गरज नाही. हे अॅपचा शुभारंभ प्रथम मुंबईतून होणार असून त्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये ही सेवा पुरविण्यात येणार आहे.

ही सेवा सुरु करण्यासाठी प्रवाशांना UTS मोबाईल अॅपच्या माध्यमातून तिकीट बुक करावे लागेल. त्यानंतर एक क्यूआर कोड मिळेल. बुकिंग झाल्यानंतर स्थानकावर पोहोचून त्याचे प्रिंटआउट प्रवाशांना घ्यावे लागेल. प्रिंटआउट घेण्यासाठी रेल्वे स्थानकांवर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR) मशीन लावण्यात येणार आहे.

हे मशीन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, चर्चगेट, दादर, बांद्रा, अंधेरी आणि बोरिवली याठिकाणी लावण्यात येणार आहे.

Comments
Loading...