शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्याला होतोय शिवसैनिकांकडूनचं विरोध

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने शिवसेना जरी मजबूत झाली असली तरी स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधात श्रीरामपुरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘सत्तेसाठी ससाणे साहेब, विखे साहेब, थोरात यांना फसवणाऱ्या गद्दार व बिनकामाच्या आमदाराला पाडायचं, असा मजकूर असलेले बॅनर शहरभर झळकले आहेत, त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये कांबळे यांच्या विरोधातील नाराजी समोर आली आहे.

याआधी ससाणे, विखे आणी नंतर थोरातांची साथ सोडणारे कॉंग्रेसचे आमदार आता शिवसेनेत दाखल आहे. मात्र, तिथेही त्यांना विरोध होताना दिसतोय. आज श्रीरामपूर शहरभर आमदाराला पाडायचंय अशा प्रकारचे अनेक बॅनर अज्ञात व्यक्तींनी लावले आहेत. त्यामुळे कांबळे यांच्यासह शिवसेनेचीही चिंता आता वाढली आहे. त्यामुळे शिव्सेनेंचे वरिष्ठ नेते यावर काय तोडगा काढतात हे पाहन महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भाऊसाहेब कांबळे यांना कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी कांबळे यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.