मतदानावर बहिष्कार घालणाऱ्या नक्षलवाद्यांचे बॅनर जाळून स्थानिकांकडून प्रत्युत्तर

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकांच्या प्रचारसभा काल संपल्या आहेत. राजकीय नेत्यांनी राज्यभर घेतलेल्या प्रचार सभांमुळे मतदानाच्या बाबतीत आदिवासी भागातील जागरूक झालेल्या नागरिकांनी नक्षल वाद्यानाही सडेतोड उत्तर दिल्याची घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे.

राज्यात सोमवारी (ता २१) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्याआधीच नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदानावर बहिष्कार घालण्यास सांगणारे बॅनर लावले होते. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांच्या या कृतीला स्थानिकांनी साडेतोड उत्तर देत बहिष्काराच्या बॅनरची होळी केली. यात २०० नागरिकांनी सहभागी होत नक्षलवाद्यांनी केलेल्या मतदानाच्या बहिष्काराला विरोध करत ते बॅनर पेटवून दिले.

नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातील भुसेवाडा, कुकामेटा, आलदंडी या 3 गावातही मोठया प्रमाणात बॅनरबाजी केली. बॅनरमध्ये “मतदानावर बहिष्कार करा, देश आजही गुलाम आहे. ” असं घोषवाक्य त्यात लिहिली होती. नक्षलवाद्यांकडून नेहमीच मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करण्यात येतं. अनेकदा या काळात बंदही पुकारला जातो. मात्र, यावेळी स्थानिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेने नक्षलवादी चळवळीला योग्य संदेश गेल्याची चर्चा आहे. तर नागरिक त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक होत असल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :