लातूर भाजपला धक्का? जयंत पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

लातूर :  राष्ट्रवादीने भाजपला धक्का देत लातूर भाजपमधील मोठ्या नेत्यांचा पक्षात समावेश केला आहे. माजी महापौर अख्तर मिस्त्री आणि भाजपचे माजी महापौर सुरेश पवार यांचे चिरंजीव घनश्याम सुरेश पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. वंचित बहुजन आघाडीचे राजा मनियार देखील राष्ट्रवादीमध्ये गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी मुंबईतील पक्षीय कार्यलयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लातूर शहरातील चार नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यातील अख्तर मिस्त्री हे माजी महापौर आहेत. तर भाजपचे माजी महापौर सुरेश पवार यांचे चिरंजीव घनश्याम सुरेश पवार यांचाही त्यात समावेश आहे. तर दुसरीकडे माजी महापौर सुरेश पवार हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप तरी तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या बरोबरच वंचित बहुजन अघाड़ीचे २०१९ ची लातूर शहराची विधानसभा निवडणूक लढवलेले राजा मनियार यांनी देखील राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे शहरात भाजपला खिंडार पडली आहे. या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी काँग्रेसच्या वतीनेही प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. या नेत्यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP