शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत आमची शेतकरी कर्जमाफी सुरुच राहील, शेतकऱ्यांनी निर्धास्त रहा : फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. तसेच शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत आमची शेतकरी कर्जमाफी सुरु राहील. शेतकऱ्यांनी निर्धास्त रहावे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर शाब्दिक निशाणा साधला. ते म्हणाले, ‘विरोधी पक्ष निवडणुकीत गावा-गावासाठी अन् तालुक्यासाठीही आश्वासने देत आहेत, त्यांना खात्री नसल्यानेच ते अशी वारेमाप आश्वासने देत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही गेली पाच वर्षे सातत्याने शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. त्यांना विविध सवलती व योजना दिल्या. त्यामुळे शेतकरी स्वावलंबी होण्याच्या दिशेने काम झाले आहे. कॉंग्रेस आघाडीच्या सरकारने पंधरा वर्षात देशातील शेतकऱ्यांना तुटपुंजी कर्जमाफी दिली, असे म्हणाले.

दरम्यान, आम्ही दहा हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. शेवटच्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना सुरुच राहील, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या