कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी संकेतस्थळावरून गायब

सोलापूर : मोठा गाजावाजा करत गुरुवारी मुंबईसह राज्यभरात सरकारकडून प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. तर त्यानंतर तीन दिवस सलग सुट्टी आल्याने सोमवारपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरळीत पार पडणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र
राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफीच्या अधिकृत संकेतस्थळावरून पात्र शेतकऱ्यांच्या याद्याच गायब झाल्याने कर्जमाफीतील सावळागोंधळ समोर आला आहे.

कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी सुटी संपल्यानंतर सोमवारपासून प्रक्रिया सुरळीत होणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, सोमवारपासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या अधिकृत संकेतस्थळावरून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्याच गायब झाल्या आहेत. दरम्यान यावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तांत्रिक अडचणीमुळे याद्या दिसत नसल्याच सांगत. शासनाच्या निर्णयानुसार कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू असून काही तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या दिसत नसतील. मात्र बँकनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. बँकेकडून प्रत्यक्षात याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे याद्या दिसत नसल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा झाली असून. येत्या दोन दिवसांत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याच सांगितल आहे.

You might also like
Comments
Loading...