शेतकरी कर्जमाफीला अखेर मुहूर्त मिळाला; १८ ऑक्टोबरपासून कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा होणार

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील बहुचर्चित शेतकरी कर्जमाफीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बुधवारी म्हणजेच १८ ऑक्टोबरपासून पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान बुधवारी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यभरातील जिल्ह्यामध्ये संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांच्या सत्कार समारंभांच आयोजन करण्यात आलं आहे. तर आधीच सरकारकडून कर्जमाफीच्या अंमलबजावणीला उशीर झाल्याची ओरड करण्यात येत होती. मात्र बुधवारपासून जरी कर्जामाफीचे वितरण केले जाणर असले तरी दिवाळीमुळे गुरुवार ते रविवार सलग चार दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्यासाठी सोमवार म्हणजे आठवडाभाराची वाट पहावी लागू शकते.,

१८ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापुर्वी प्रत्येक जिल्हयातील पहिल्या फेरीतील पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचे नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याशिवाय योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना नंतर स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रणेमार्फत प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रकमेच वाटप केल जात असतानाही भाजप सरकारकडून सत्कार समारंभ आयोजीत केले जात असल्यामुळे भाजप आपल्या परंपरेप्रमाणे मोठा इव्हेंट करत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी?

वाशिम – 45 हजार 417

अकोला – 1 लाख 11 हजार 625

बीड – 2 लाख 8 हजार 480

चंद्रपूर – 99 हजार 742

गोंदिया – 68 हजार 290

मुंबई शहर – 694

मुंबई उपनगरे – 119

अहमदनगर – 2 लाख 869

 

जळगाव – 1 लाख 94 हजार 320

लातूर – 80 हजार 473

नागपूर – 84 हजार 645

औरंगाबाद – 1 लाख 48 हजार 322

सोलापूर – 1 लाख 8 हजार 533

यवतमाळ – 2 लाख 42 हजार 471

अमरावती – 1 लाख 72 हजार 760

भंडारा – 42 हजार 872

धुळे – 75 हजार 174

बुलडाणा – 2 लाख 49 हजार 818

गडचिरोली – 29 हजार 128

नाशिक – 1 लाख 36 हजार 569

परभणी – 1 लाख 63 हजार 760

रत्नागिरी – 41 हजार 261

सिंधुदुर्ग – 24 हजार 447

 

जालना – 1 लाख 96 हजार 463

 

नांदेड – 1 लाख 56 हजार 849

उस्मानाबाद – 74 हजार 420

पुणे – 1 लाख 83 हजार 209

सांगली – 89 हजार 575

 

हिंगोली – 55 हजार 165

कोल्हापूर – 80 हजार 944

नंदुरबार – 33 हजार 556

पालघर – 918

रायगड – 10 हजार 809

सातारा – 76 हजार 18

ठाणे – 23 हजार 505

You might also like
Comments
Loading...