अखेर शेतकरी कर्जमाफीला मुहूर्त मिळाला

३४ हजार कोटींच्या शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई – शेतकरी कर्ज माफीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला आज अभूतपूर्व यश मिळाल आहे .  मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये  ऐतिहासिक निर्णय घेत ३४ हजार कोटींच्या  शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे . या कर्जमाफीचा फायदा राज्यातील तब्बल ८९ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.  तर ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा सरकार संपूर्णपणे कोरा करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे . हि कर्जमाफी घोषित करताना सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भावनेला हात घटल्याच दिसून येत आहे. कारण या कर्जमाफीला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराज कृषी सन्मान योजना’ असे नाव देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे

१, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराज कृषी सन्मान योजना’ असे नाव या शेतकरी कर्जमाफीला देण्यात आले आहे

२ .पुनर्गठीत, थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा

३.  नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान, अनुदान थेट बँक खात्यात जमा करणार

४. ३० जून २०१६ पर्यंतच्या कर्जांची माफी होणार

५.  ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

६.  बँकांच्या माध्यमातून सरकार ३४ हजार कोटी रुपये उभारणार. हे पैसे बँकांना टप्प्या टप्प्याने राज्य सरकार परत करणार

७.  भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घेणार

८ .  आयकर भरणारे आणि व्यापारी आणि व्हॅटला पात्र असणाऱ्यांना कर्जमाफीतून वगळलं

You might also like
Comments
Loading...