मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत आसामला तळ ठोकला आहे. आपल्याच पक्षातील आमदारांनी साथ सोडल्यामुळे शिवसेना संपली असे विरोधकांकडून म्हटले जात आहे. मात्र याचा परिणाम महाविकास आघाडी सरकारवरही दिसून येत आहे. शिंदे यांच्या गटात सेना आमदारांची संख्या वाढत आहे तर इकडे सेनेला गळती लागली आहे. आज (२४ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधत बंड आमदारांना आव्हान दिले आहे.
“माझं नाव, फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा. तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालं आहे. मात्र तिकडे तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. मी बाळासाहेबांचे फोटो वापरून ब्लॅकमेल करत नाही.”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी बंड करणाऱ्या आमदारांना सुनावले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, ““मला सत्तेचा लोभ नाही. मी वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय पण जिद्द कायम आहे. आणि आत्ताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. स्वप्नातही विचार केला नव्हता की, सोबतचे असे वागतील. मी बरा होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलतेय पण ते मानेचं दुखणं होतं. शरीराचे काही भाग बंद पडत होते, त्यामुळे दोन वेळा ऑपरेशन करण्याची वेळ आली होती. मात्र मी अजून जिद्द सोडली नाही, जिद्द अजूनही कायम आहे.”,
महत्वाच्या बातम्या:
- Uddhav Thackeray : “वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय पण…”, उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
- Uddhav Thackeray Live : तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालंय, उद्धव ठाकरे संतापले
- Bhaskar Jadhav : आपल्या कोट्यातील तीन मंत्री पद अपक्ष आमदारांना का दिली? भास्कर जाधव यांचा सवाल
- pravin darekar : “राज्यसरकारकडून अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश…” ; भाजपकडून राज्यपालांना पत्र
- Assam Congress : आसाम कॉंग्रेसचा एकनाथ शिंदेंना इशारा, राज्य सोडण्याचे दिले आदेश