Live Updates : जळगावात शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई

टीम महाराष्ट्र देशा- प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या जळगावच्या महानगरपालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून एकोणवीस प्रभागांसाठी 75 जागासाठी 303 उमेदवार रिंगणात आहेत. जळगावच्या नगरपालिकेवर गेल्या 35 वर्षांपासून सुरेश जैन प्रणित खानदेश विकास आघाडी या गटाचे वर्चस्व होतं, एक हाती सत्ता होती. मात्र यावेळेस खानदेश विकास आघाडीच्या अंतर्गत ही निवडणूक न लढता सुरेश जैन यांनी ही निवडणूक शिवसेनेच्या चिन्हा अंतर्गत घडलेली आहे.

भाजप-शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत आहेत तर या निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी या निवडणुकीत बघायला मिळत असली तरी प्रत्यक्षात 10 वार्डामध्ये त्यांचे उमेदवार परस्परविरुद्ध मध्ये उभे आहेत, शासनाच्या वतीने मतदारांसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती.

Live Updates :
-जळगाव : महानगरपालिका मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात
– जळगाव : मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मतमोजणी ठिकाणी पत्रकारांना प्रवेश नाकारला. मीडिया कक्षातून टीव्ही पहा आणि रिपोर्टींग करा अशा सूचना

– जळगावमध्ये भाजपा ३ तर शिवसेना २ जागी आघाडीवर
अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत नसल्याने मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांची निदर्शनं