तब्बल 27 तसानंतर पी. चिदंबरम रिचेबल, कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

blank

टीम महाराष्ट्र देशा : नॉट रिचेबल असणारे कॉंग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम हे 17 तासांनी अखेर समोर आले आहेत. त्यांनी दिल्लीच्या कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले आहेत. माझा आणि माझ्या कुटुंबाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. INX प्रकरणातील सर्व आरोप खोटे आहेत, असे पी. चिदंबरम यांनी या पत्रकार परिषदेत म्हंटले आहे. या पत्रकार परिषदेनंतर पी. चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे पथक दाखल झाले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पी. चिदंबरम यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

आयएनएक्स मिडिया घोटाळाप्रकरणी चिदंबरम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर, काल त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला ते कुठंच सापडले नाहीत. त्यामुळे दोन तासात सीबीआयपुढं हजर व्हा, अशी नोटीस त्यांच्या घरावर चिकटवून या पथकाला परत यावं लागलं. चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ मधे आयएनएक्स या माध्यमसमूहाला ३०५ कोटी रुपयांचा परदेशी निधी स्वीकारण्यासाठी परवानगी देण्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.