Budget 2019;अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 6000 रुपये थेट खात्यात जमा होणार

टीम महाराष्ट्र देशा- देशाचे नियमित अर्थमंत्री अरुण जेटली हे कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे पियुष गोयल हे देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात मोदी सरकार भरघोस घोषणा करण्यात येत आहेत. यापैकीच एक अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. आता 6000 रुपये थेट खात्यात जमा करण्याची घोषणा गोयल यांनी केली आहे.

मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाच्या स्थापित परंपरा मोडून सरकार काही सवलती देऊ शकते, असे मानले जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचा दावा गोयल यांनी केला आहे. भारतात परदेशी गुंतवणूक वाढली आहे. एफडीआय आम्ही 2.13 बिलियन वर घेवून गेलो. वित्तीय तुट आम्ही 3.4 टक्क्यावर आणली. सध्या महागाई दर कमी झालाआहे. आपण जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनलो असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे.

Loading...

Budget 2019 live updates

 • सरकार सुरू करणार कामधेनू योजना; गोयल यांची घोषणा
 • दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार; गोयल यांची घोषणा
 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार
 • आमचे उद्देश आहे की गावाचा आत्मा कायम ठेवतानाच त्यांना शहरासारख्या सोयी देखील मिळाव्या
 • अन्नधान्य सर्वांना मिळावे म्हणून आम्ही आवश्यक ती सर्व पाऊले उचलली
 • आर्थिक आधारावर गरीबांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे
 • रेरा, आणि बेनामी संपत्ती कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी मदत करणारे ठरले आहे
 • स्वच्छ भारत अभियान हे आता सरकारी आंदोलन राहिले नाही, ते लोकांनी स्वीकारलेले आंदोलन आहे
 • शेअर बाजार 120 अंकांनी वधारला आहे
 • एनपीए बाबत बँकांची खरी परिस्थिती लोकांसमोर आणा हे आरबीआयला सांगण्याची आमची हिम्मत होती
 • डिसेंबर 2018मध्ये चलनवढीचा दर हा फक्त 2.1 टक्के होता
 • वित्तीय तूट 3.4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आम्हाला यश आले
 • महागाईवर आम्ही नियंत्रण मिळवलं
 • ‘हमारी सरकारने कमरतोड महंगाई की कमर तोड दी’
 • 2022 पर्यंत आमचे सरकार सर्वांना घरे देणार
 • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
 • देशातील भ्रष्टाचार नष्ट केला
 • आज देश जगातील सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश झाला

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता