LIVE : सांगलीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून दोन्ही महापालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवारांचा आज फैसला लागणार आहे. सांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील तर जळगावात सुरेशदादा जैन या दोन दादांची प्रतिष्ठापणाला लागलीये.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी 62 टक्के तर जळगाव महापालिकेच्या 19 प्रभागातील 75 जागांसाठी अंदाजे 55 टक्के मतदान झालंय. सांगलीत 11 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप सह शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलीये.

LIVE
सांगली निवडणूक निकाल : भाजप 6, काँग्रेस 5 आणि राष्ट्रवादीला 4 जागांवर आघाडी
सांगली निवडणूक निकाल : पहिला कल हाती, काँग्रेसला 3 तर भाजपला एका जागेवर आघाडी
सांगली निवडणूक निकाल : भाजप 6, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 5, अपक्ष 1 जागा
#सांगली – पोस्टल मतमोजणीला सुरुवात, पहिले कल काही क्षणात हाती

Karnataka Election; भाजपची जोरदार मुसंडी