live अर्थसंकल्प २०१८: राष्ट्रपती,खासदारांच्या मानधनात होणार वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेवटचा अर्थ संकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या. सोबतच राष्ट्रपतींसह संसदेतील लोकप्रतिनिधींच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली देखील केली. त्यामुळे राष्ट्रपती व खासदारांचे नक्कीच सुगीचे दिवस येतील. राष्ट्रपतींचे मानधन पाच लाख, उपराष्ट्रपतींचे मानधन ४ लाख आणि राज्यपालांना प्रत्येक महिन्याला ३ लाख इतके मानधन मिळेल. तसेच खासदारांना चालू वर्षापासून खासदारांचे मानधनात वाढ करण्याची घोषणा केली.

अर्थसंकल्पात खासदारांच्या वेतन वाढीच्या घोषणेला विरोध होण्याची श्यक्यता आहे. या आधी अनेक नेत्यांनी खासदारांच्या वेतनात वाढ करू नये अशी मागणी केली होती. सुलतानपूरचे खासदार गांधी यांनी लोकसभा व राज्यसभा सदस्यांच्या वेतनावर आक्षेप नोंदवित खासदारांच्या वेतनवाढीला विरोध केला होता. लोकसभा सभापतींना लिहिलेल्या पत्रात गांधी म्हणाले होते, लोकसभा सदस्यांची सरासरी संपत्ती अंदाजे १५ कोटी रुपये, तर राज्यसभा सदस्यांच्या सरासरी संपत्ती अंदाजे २० कोटी रुपये आहे. या खासदारांवर केंद्र सरकार वर्षाला तीनशे ते चारशे कोटी रुपये खर्च करते. त्यामुळे वेतनवाढ कोणत्या कारणासाठी? विशेष म्हणजे या खासदारांनी सामाजिक जाणिवांचे भान ठेवून मासिक वेतनही स्वीकारू नये.” असे गांधी म्हणाले होते.Loading…
Loading...