live अर्थसंकल्प २०१८: अर्थमंत्री अरुण जेटलींची आरोग्य विषयक महत्वाची घोषणा

देशातील ५० कोटी लोकांना होणार फायदा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपुर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा म्हणजेच इलेक्शेन बजेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी संसदेत सादर केला. मोदी सरकारने तब्बल २२ लाख कोटी रुपयांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये काही आरोग्य विषयक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

देशातील १० कोटी कुटुंबांना अर्थात सरासरी ५० कोटी लोकांना प्रति वर्ष ५ लाखांचा आरोग्य विमा जाहीर करण्यात आला आहे. जगातल्या सगळ्या देशांमध्ये भारताने जाहीर केलेला हा सर्वाधिक आरोग्यविमा आहे असा दावा अरूण जेटली यांनी केला आहे. राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा देशाच्या एकूण जनतेपैकी ४० टक्के लोकांना होणार आहे असेही अरूण जेटली यांनी म्हटले आहे. या योजनेचा गरीब जनतेला फायदा होणार होणार आहे. यामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दरवर्षी ५ लाखांची आरोग्य मदत जाहीर करण्यात आली आहे. या आधी आरोग्य विमा ३० हजारापर्यंत दिला जायचा अरुण जेटली यांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्य विमा आता ५ लाख रुपये वार्षिक असणार आहे.