शालेय मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत शिजला चक्क साप

टीम महाराष्ट्र देशा- शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी पोषण आहार म्हणून माध्यान्य भोजन दिले जाते. या भोजनात दिलेल्या खिचडीत चक्क एक साप आढळला आहे. ही खिचडी या सापासकट शिजवण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडलाय.

खिचडी खाण्याआधी शिक्षकांच्या तपासणीत एका विद्यार्थ्याच्या ताटात मृतावस्थेतील साप आढळला. त्यानंतर विद्यार्थ्यांना खिचडी खाऊ न देता त्या खिचडीची विल्हेवाट लावण्यात आली. सुदैवाने, ही खिचडी कुणीच खाल्ली नाही आणि अनर्थ टळला. आता हा प्रकार मुळात घडलाच कसा, याची सरकार गंभीरपणे दखल घेऊन चौकशी करेल का, याचं उत्तर शिक्षण खात्याला द्यावं लागेल.