राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी आठ दिवसात जाहीर

ncp

टीम महारष्ट्र देशा – आगामी लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी आठ दिवसात जाहीर होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. निर्धार परिवर्तन यात्रा माढा लोकसभा मतदार संघातील भोसे (ता. पंढरपूर) येथे आली होती. त्यावेळी पाटील हे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पाटील म्हणले की, केंद्रातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचीत आघाडी सारख्या अन्य समविचारी पक्षांसोबत युती करुन निवडणूक लढवावी लागणार आहे. त्या दृष्टीने समविचारी पक्षांसोबतचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी येत्या आठ दिवसात जाहीर होईल असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या साडेचार वर्षात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. सरकारच्या खोट्या आश्वासनाला जनता कंटाळली आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.