सर्वाधिक हॅक पासवर्डसची लिस्ट जाहीर ; यात तुमचाही पासवर्ड नाही ना ?

टीम महाराष्ट्र देशा : आज ऑनलाईन च्या जगात प्रत्येकजण सोशल मिडियापासून ते मोबाईल लॉक पर्यंत सर्वत्र पासवर्डचा वापर करतो. आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड अत्यंत महत्वाचा ठरतो. परंतु तो पासवर्ड मजबूत नसेल तर तो पासवर्ड हॅक करून तुमची माहिती, डेटा चोरने खूप सोपे आहे.

बऱ्याचदा लक्षात राहील असा आणि ओळखायला सोपा असा जाईल असा अनेकजण पासवर्ड ठेवतात. परंतु असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. नुकतीचं सर्वाधिक हॅक होणाऱ्या पासवर्डची यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये जर तुम्ही वापरत असलेला पासवर्ड असेल तर तो ताबडतोब बदलून स्वतःचा डेटा सुरक्षित करा.

UKच्या साइबर सिक्योरिटी सेंटर(NCSC) ने जाहीर केलेल्या यादीत १२३४५६ हा जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा पासवर्ड आहे. जगातील २ कोटी ३० लाख हॅक झालेल्या अकाऊंटचा तो पासवर्ड होता.

सर्वाधिक हॅक केले जाणारे पासवर्ड :

 • १२३४५६ (२.३२ कोटी)
 • १२३४५६७८९ (७७ लाख )
 • qwerty (३८ लाख)
 • password (३६ लाख)
 • १११११११ (३१ लाख )
 • १२३४५६७८ (२९ लाख )
 • abc१२३ (२८ लाख)
 • १२३४५६७ (२५ लाख)
 • password१ (२४ लाख)
 • १२३४५ (२३ लाख)
 • १२३४५६७८९० (२२ लाख)
 • १२३१२३ (२२ लाख)
 • ०००००० (१९ लाख)
 • Iloveyou (१६ लाख)
 • १२३४ (१३ लाख)
 • १q२w३e४r५t (१२ लाख)
 • Qwertyuiop (११ लाख)
 • १२३ (१० लाख)
 • Monkey (९.८ लाख)
 • Dragon (९.६ लाख)