जाणून घ्या : मेगाभरतीत भाजपात गेलेल्या नेत्यांचा पूर्व इतिहास

धनश्री राऊत : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये आज मेगाभरती सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदार भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, कालीदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी आपल्या आमदरकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आज हे चारही जण भाजपवासी झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजीमहिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीदेखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत गरवारे क्लबच्या कार्यक्रमात हा प्रवेश पार पडला. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे.

 

     १. शिवेंद्रसिंहराजें भोसले

 • साताऱ्याच्या जावळी मतदारसंघातून आमदार
 • सलग तीन वेळा विजयी
 • सातारा जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी
 • अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, मार्गदर्शक
 • सातारा कृषी समिती, जावळी पंचायत समितीचे संचालक
 • नगरविकास आघाडीचे संस्थापक

   

 २. कालिदास कोळंबकर

 • वडाळ्यातील कॉंग्रेस आमदार
 • यापूर्वी पाच पेक्षा जास्त वेळा विजय
 • पहिल्यांदा शिवसेना, नंतर राणेंसोबत २००५ मध्ये कॉंग्रेसमध्ये
 • शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पुन्हा विजयाचा झेंडा
 • २०१४ साली विधानसभेत अवघ्या १ हजारपेक्षा कमी मतांनी कॉंग्रेसमधून विजयी

     

३. संदीप नाईक

 • २००५ मध्ये नगरसेवक म्हणून राजकारणात प्रवेश
 • २००७-०८ मध्ये नवी मुंबईच्या स्थायी समितीचे सभापती
 • नवी मुंबईचे महापौर होण्याचे स्वप्न भंगले
 • तरूण नेते म्हणून ओळख

     

  ४. चित्रा वाघ

 • राष्ट्रवादी – कॉंग्रेसमधील आक्रमक नेत्या म्हणून ओळख
 • महिला आघाडीच प्रदेशाध्यक्षपद भूषवलं
 • २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला विरोधी पक्षाची भूमिका निभावली
 • आक्रमक वक्तृत्वामुळे राज्यात त्यांची छाप
 • महिला आघाडी सक्षम केली

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

‘खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आता भाजपात दाखल झाले आहेत’

‘सोडून जाणाऱ्या नेत्यांमुळे पवारांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील’ : जितेंद्र आव्हाड

#पक्षांतर : ‘ज्यांना जायचंय त्यांनी लवकर जावं, काँग्रेस शुद्ध होईल’

शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आमने-सामने