दारू तस्करी करताना किरीट सौमय्याला अटक; फिल्मी स्टाईलने पोलिसांनी केला पाठलाग

ठाणे: दारू माफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरीट सौमय्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आल आहे. सोमय्या हा ट्रकच्या टायर ट्यूबमधून गावठी दारूची तस्करी करण्यासाठी प्रसिद्ध आहे, ठाणे पोलिसांनी काल फिल्मी स्टाईलने पाठलागकरून त्याला अटक केली.

मुंबईतील जोगेश्वरी भागात राहणारा किरीट रामजीभाई सौमय्या हा कारच्या डिक्कीमधून टायर ट्यूबमध्ये गावठी दारूची तस्करी करतो. काल दारू घेवून घोडबंदर रोडवरून जुहूकडे जात असताना पोलिसांनी त्याला रंगे हात अटक केली. यावेळी त्याच्याकडून दारूने भरलेल्या १४ ट्यूबचा साठा जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान एखद्या सिनेमात पाहतो अशा प्रकारे पाठलागकरून पोलिसांनी सौमय्याला अटक केली आहे.

 

You might also like
Comments
Loading...