fbpx

ओठ मुलायम ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय

lips

वातावरणात गारवा, मस्त गारेगार थंडी वगैरे असं अल्हाददायक वातावरण सध्या नक्की आहे. मात्र, या हिवाळी सुरु झाला की आपली त्वचा शुष्क होते. अनेकांचे ओठ फाटतात. विशेष म्हणजे बहुतांश जणांना ओठ फाटण्याची समस्या भेडसावत असते. आपले ओठ मुलायम ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओठ फाटल्यास ओठ चावणे टाळा. दातांनी ओठांवरील शुष्क त्वचा खेचणं किंवा खरडवणं टाळा. यामुळे संसर्ग होऊन इजा होण्याची दाट शक्यता असते. ओठांना सारखी सारखी जीभ लावणंही टाळावं. ओठ सुकल्यासारखं वाटल्यास फार फार तर लीप बाम लावा किंवा पाणी प्यावं.

ओठांवर शुष्क त्वचा निर्माण झाल्यास ती काढण्यासाठी बेबी ब्रशचा वापर करावा किंवा ओठांना पुसण्यासाठी ओल्या कापसाच्या बोळ्याचा वापर कारवा. किंवा अगदी टिश्यू पेपरचा वापर केला तरीही चालेल.

महिलांनी लिपस्टिक लावण्यापूर्वी मॉईश्चरायझर लावावा. हिवाळ्यात लिपस्टिक लावल्यास ओठ आणखी शुष्क होतात.

मॅट लिपस्टिक लावण्याचं टाळा. कारण अशा लिपस्टिकमुळे ओठ लवकर सुकतात. जर तुम्हाला मॅट लिपस्टिक लावायचीच असेल, तर त्याआधी लिपबाम लावण्यास विसरु नका.

साधारणत: फ्रूट फ्लेव्हर्ड लिप बाम लावण्याचं टाळा. कारण यामध्ये आर्टिफिशिअल रंग मिसळलं असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ओठांना खाज किंवा ओठ सुकण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओठ किंवा हिवाळ्यात त्वचेला निर्माण होणाऱ्या समस्या रोखायच्या असल्यास मुबलक पाणा पिणं, हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. किंवा मुबलक पाणी पिणं हा सौंदर्याचा मूलमंत्र आहे, असे म्हणूय ना. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यायला हवं.