मेस्सीने केलेल्या गोल कडे रेफ्रींचा कानाडोळा

valancia vs barca2

मेस्ताला – लिओनेल मेस्सीने केलेला गोल अर्धा फूट गोलजाळ्यात जाऊनही रेफ्रींनी तो नाकारल्याने स्पॅनिश स्पर्धेत बार्सिलोनाला वेलेन्सियाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.अतिशय महत्वाच्या या सामन्यात मेस्सीने ३० व्या मिनिटाला गोल केला. गोलजाळ्यात चेंडू अर्धा फूट आत गेलेला असताना वेलेन्सियाचा गोलरक्षक नेटोने हाताने चेंडू बाहेर फेकला. गोल झाल्याचे बार्सिलोना खेळाडूंना समजताच मेस्सीसह सर्वांनी जल्लोष करण्यास सुरवात केली; परंतु रेफ्री इग्नासिओ लेग्लेसियास यांच्या मनात काही वेगळे होते. गोल नाकारत त्यांनी खेळ पुढे सुरू ठेवला पंचांच्या या निर्णयाने मेस्सी सह सर्वचजण बुचकळ्यात पडले होते. बार्सिलोनाची गुणतक्त्यात आघाडी असली तरी रविवारचा सामना त्यांनी जिंकला असता, तर आघाडी अधिक भक्कम करण्याची त्यांना संधी होती.