भाजप अध्यक्षांच्या वक्तव्यावर मठाधिपती चिडले; कर्नाटकात २२० मठांनी दिला कॉंग्रेसला पाठींबा

lingayat-pontiffs-support-siddaramaiah-biggest-setback-for-bjp

देशभरात विजय संपादन करणाऱ्या भाजपला कर्नाटक राज्यात फटका बसणार असल्याच दिसत आहे. कारण स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्यास नकार दिल्याने राज्यभरातील प्रमुख २२० मठांनी भाजपला विरोध करत कॉंग्रेसला पाठींबा दिला आहे. या सर्व मठांचा देशभरातील लिंगायत समजावर मोठा प्रभाव आहे.

कर्नाटक निवडणुकीची आचार संहिता लागण्याच्या काही दिवस आधी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वेगळ्या लिंगायत धर्माला मान्यता देत, पुढील प्रक्रीयेसाठी केंद्र सरकार दरबारी वेगळ्या धर्माचा चेंडू टोलवण्यात आला. मात्र लिंगायत हे हिंदू असून कोणत्याही परिस्थितीमध्ये वेगळ्या धर्माला मान्यता देणार नसल्याच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले होते. त्यामुळे नाराज झालेल्या 220 मठांच्या मठाधिपतींनी बैठक घेऊन काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केली.

बंगळुरुच्या बसव भवनमध्ये झालेल्या बैठकीत चित्रादुर्गाचे प्रसिद्ध मुरुगा मठाचे मठाधिपती राजेंद्र स्वामी, बसव पीठाच्या प्रमुख माता महादेवी, सुत्तुर मठाचे मठाधिपतींसह एकूण 220 मठाचे मठाधिपती सहभागी झाले होते. या बैठकीत सर्व मठाधिपतींनी काँग्रेसला समर्थन देण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच भाजपच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.Loading…
Loading...