सांगली लिंगायत महामोर्चामध्ये लाखो बांधव सहभागी; संपूर्ण शहर झाले भगवामय

सांगली: लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची संविधानिक मान्यता देण्यात यावी तसेच विविध  मागण्यांसाठी आज सांगलीमध्ये महामोर्चा काढण्यात आला आहे. सांगली,सातारा,कोल्हापूर सोलापूरसह कर्नाटक तसेच मराठवाड्यातूनही लाखोंच्या संख्येने लिंगायत बांधव सांगलीत दाखल झाले आहेत.   मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रसंत जगद्गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य हे करत असून देशभरातील जगद्गुरू, महाराष्ट्र, कर्नाटकातील लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय, धर्मिय बांधव, संघटना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या आहेत.

कर्नाटक व महाराष्ट्रात आतापर्यंत लिंगायत समाजाच्या वतीने 10 मोर्चे काढण्यात आले आहेत. महाराष्ट्रात नांदेड व लातूर पाठोपाठ सांगलीत निघणारा हा तिसरा महामोर्चा आहे. लातूरमध्ये निघालेल्या महामोर्चात 5 लाखाहून समाज बांधव रस्त्यांवर उतरले होते. त्याहीपेक्षा मोठा प्रतिसाद सांगलीतील महामोर्चास पहायला मिळत आहे.

You might also like
Comments
Loading...