“स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी म्हणजे हिंदू लिंगायत समाजात फूट पडण्याचा प्रकार”

कर्नाटकचे आमदार एम. बी. पाटील, नांदेडचे अविनाश भोसेकर यांचा हा कुटील डाव असल्याचा आरोप सर्वपक्षीय युवा नेत्यांनी मिरजमध्ये पत्रकार परिषदेत केला आहे .

मिरज-‘काही दिवसांपूर्वी निघालेल्या लिंगायत महामोर्चात स्वतंत्र लिंगायत धर्माची केलेली मागणी म्हणजे हिंदू लिंगायत समाजात एक प्रकारे फूट पडण्याचा प्रकार आहे मात्र, हा कुटील डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही असं मत सर्वपक्षीय युवा नेत्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं . या वेळी महेश गवाणे, अभिजित हारगे, चंद्रकांत मैगुरे, राजू कोरे, मनोहर कुरणे, जयगोंड कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

काय म्हणणं आहे सर्वपक्षीय युवा नेत्यांच ?

सण, संस्कृती, उत्सव व देव सर्व एक असताना वेगळा धर्म कसा काय होऊ शकतो? बसवेश्वर महाराजानीही कधी स्वतंत्र धर्माची मागणी केली नाही, उलट हिंदू धर्मात असणाऱ्या काही अनिष्ठ रुढी, परंपरा, वर्णभेद, व जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. स्त्री-पुरुष समानतेची शिकवण देऊन धर्माला संघटीत ठेवण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्मामध्ये लिंगायत समाजाची कधीही उपेक्षा केली नाही. उलट लिंगायत समाजास मानाचे स्थान दिले आहे. मात्र, लिंगायत समाजाची काही मंडळी दिशाभूल करून फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्नाटकचे आमदार एम. बी. पाटील, नांदेडचे अविनाश भोसेकर यांचा हा कुटील डाव असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत