स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी लिंगायत समाज औरंगाबादमध्ये एकवटला !

lingayt community

औरंगाबाद: अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे औरंगाबादमध्ये रविवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये जोरदार घोषणा देण्यात आल्या. लिंगायत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. सामाजिक समस्या आहेत. इतर धर्मांप्रमाणे लिंगायतांची विशिष्ट संस्कृती, आचरण पद्धती आहे. मात्र शासकीय सवलती मिळत नाहीत. असे मोर्चेकर्यांनी स्पष्ट केले.

‘मी लिंगायत…माझा धर्म लिंगायत’, ‘एक लिंगायत कोटी लिंगायत’, ‘भारत देशा जय बसवेशा’, आशा घोषणांचे फलक हातात घेऊन लिंगायत धर्माला मान्यता मिळावी म्हणून मोर्चा काढण्यात आला.

लिंगायत धर्माची शासकीय मान्यता हिरावून घेतल्याने सवलती मिळत नाहीत. धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सर्व सवलती मिळाव्या म्हणून हा मोर्चा शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि माते महादेवी बेंग लुरू यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. तसेच लिंगायत समाजच्या या मोर्चाला मराठा सेवा संघ आणि औरंगाबाद शहराच्या महापौरांसह शहरातील विविध राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला.