छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही फक्त निवडणुकीसाठी वंदन करत नाही- उद्धव ठाकरे

ठाणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांना तुमच्या सारखे आम्ही केवळ निवडणुकीसाठी वंदन करत नाही, ते आमचे दैवत आहेत. असे भाजपला सुनावले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात, शिवसेनेने पाठीत वार केला. पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी लोकसभा निवडणूक आधीच होणार, हे माहित असतानाच गावित यांच्याशी बोलून ठेवले, मग त्यांनी श्रीनिवास वनगा यांना का सांगितले नाही? मुख्यमंत्री म्हणतात, आमच्या मनात होते, मग तुम्ही मोदीसारखे रेडिओवर का नाही बोलत?”असे ठाकरे म्हणाले.

ते समोर म्हणाले, “मुख्यमंत्री महोदयांना बेईमानीची काही उदाहरणे देतो. १५ लाख रुपये बँकेत जमा होणार, अच्छे दिन येणार, हे सांगणे आणि प्रत्यक्षात काही न देणे याला म्हणतात बेईमानी.”, असा जोरदार टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.