पॉवरफुल्ल नेता बनण्यापेक्षा हेल्पफुल नेता बनायला आवडेल – पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : मला पॉवरफुल्ल नेता बनण्यापेक्षा हेल्पफुल नेता बनायला आवडेल अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता टोला लगावलाय. धनंजय मुंडे यांना नुकताच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर २०१८ पॉवरफुल राजकारणी हा पुरस्कार मिळाला आहे. त्यावरून पंकजा मुंडे यांनी हा टोला लगावला आहे.

दरम्यान, एखाद्या पुरस्काराने प्रोत्साहन मिळेलही, पण तो पुरस्कार शेवटचा आहे, असे समजून लोक जल्लोष करतात, मोठ-मोठे बॅनर लावून शहर सजवतात, जाहिरातबाजीवर मोठा खर्च करतात असा टोला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना नाव न घेता लगावला होता. आता यावरून राजकारणातील सर्वात प्रतिष्ठित भाऊ-बहिणीतील संघर्ष अजूनच पेटणार असाच दिसत आहे.

तर विधान परिषदेच्या दोन जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. त्यात बीड-लातूर- उस्मानाबाद मतदारसंघात होणारी निवडणुक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी अतीतटीची ठरणार आहे. यावरून आता बीड जिल्ह्याच राजकारण चांगलाच तापायला सुरवात झाली आहे.