‘राहुल गांधी सारखा नालायक माणूस संसदेत पोहचता कामा नये’

टीम महाराष्ट्र देशा- राहुल गांधी वीर सावरकरांना भित्रा म्हणतात. सावरकरांना भित्रा म्हणणारा नालायक माणूस संसदेत पोहचता कामा नये, असा एकेरी उल्लेख करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इस्लामपूर येथे सभा भरवण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. सावरकरांना समजून घ्यायचं असेल तर त्यांचे साहित्य वाचा. मराठी समजत नसेल तर इटलीमध्ये भाषांतर करुन वाचा, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

शिवसेना-भाजप महायुतीचे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. आज महात्मा जोतिबा फुले यांची जयंती आणि आजच्याच दिवशी दख्खनचा राजा श्री जोतिबाचा प्रगट दिन आहे. या दिवशीच होणारी ही विजय संकल्प सभा म्हणजे दख्खनच्या राजाला अभिवादन करून विजयाच्या गुलालाची रंगपंचमीच खेळायची असल्याचा विश्वास माने यांनी व्यक्त केला.