जैसा बाप वैसा बेटा! राकेश टिकैत यांच्या वडिलांनी देखील दिल्लीला झुकवलं होतं

जैसा बाप वैसा बेटा! राकेश टिकैत यांच्या वडिलांनी देखील दिल्लीला झुकवलं होतं

Rakesh Tikait and Baba Mahendrasingh Tikait

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर शेतकरी बांधवांमध्ये एकच उत्साह आणि आनंद बघायला मिळाला. गेल्या दीड वर्षांपासून उन्हा-तान्हात, दिवस रात्र दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर यश मिळालं. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. मात्र अशा परिस्थित सुद्धा हार न मानता दीड वर्ष एकजुटीने त्यांनी हे आंदोलन सुरू ठेवले आणि अखेर ते तीन कृषी कायदे (Farm Laws) केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले. या सगळ्या शेतकऱ्यांचे शक्ति स्थान आणि प्रेरणा स्थान म्हणजे शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait). आज त्यांची तुलना त्यांच्या वडिलांशी केली जात आहे.

एकजुटीने लढण्याची ताकद भारतात वेळोवेळी बघायला मिळते. स्वातंत्र्याचा लढा असो नाहीतर जुलमी राजवटी विरोधात केलेलं आंदोलन असो, या सर्वात एकजुटी असल्यानेच विजय मिळत असल्याचे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांचे हे दीड वर्षांपासून सुरू असलेले आंदोलन हे देखील एकजुटीचेच एक मोठे उदाहरण आपल्यासमोर घडले आहे. राकेश टिकैत यांच्या प्रमाणेच १९८८ साली त्यांच्या वडिलांनी म्हणजेच बाबा महेंद्रसिंह टिकैत (Baba Mahendra Singh Tikait) यांनी राजीव गांधी सरकार असताना मोठा लढा दिला होता आणि त्यावेळीही तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या सरकारला या शेतकरी नेत्या समोर झुकावं लागलं होतं.

कोण होते बाबा महेंद्रसिंह टिकैत:

महेंद्रसिंह टिकैत हे देखील शेतकरी नेते होते. या सरकार प्रमाणेच राजीव गांधी सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले होते. मात्र १५ ऑक्टोबर १९८८ साली बाबा महेंद्रसिंह टिकैत यांनी ५ लाखांपेक्षा जास्त शेतकाऱ्यांसह थेट दिल्ली गाठले होते. दिल्लीच्या विजय चौकपासून ते इंडिया गेटपर्यंत आठवडाभर चाललेल्या या ठिय्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या शेतकाऱ्यांसामोर माघार घेतली होती.

बाबा महेंद्रसिंह टिकैत यांचे आयुष्य शेतकऱ्यांना संघटित करण्यात गेले. भारतीय किसान युनियनच्या स्थापनेनंतर १९८६ पासून ते आराजकीय संघटना राहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न होता. त्यांचाच वारसा घेत शेतकरी नेते राकेश टिकैत या चळवळीत सक्रिय झाले आणि मोदी सरकारला देखील झुकायला लावलं. उत्तर भारताला शेतकरी आंदोलनांचा फार मोठा इतिहास देखील आहे. या शेतकरी आंदोलनानंतर पुन्हा एकदा इतिहासाची आठवण अनेकांना झाली आणि त्याच सोबत शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वडिलांची म्हणजेच बाबा महेंद्रसिंह टिकैत यांची देखील अनेकांना आठवण झाली. तोच वारसा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यशस्वीपणे पुढे चालू ठेवला आहे.

महत्वाच्या बातम्या: