औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २७ वा नामविस्तार दिन गुरुवारी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. नामविस्तार दिनाच्या पुर्वसंध्येला विद्यापीठाच्या गेटची रंगरंगोटी, साफसफाई आणि आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
अग्निशमक दलाकडून विद्यापीठ गेट समोरील पुतळा नामांतर शहिद स्तंभ यांची स्वच्छता करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष, स्वागत मंच, तीन ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिगेट्स आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. महिला व मुलींसाठी स्वतंत्र कक्ष, मनपाकडून फिरते स्वच्छतागृह, पिण्याची पाण्याची व्यवस्था विद्यापीठ परिसरात केली गेली आहे.
नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ, अशोक बनकर, हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक सचिन सानप, मनपा अधिकाऱ्यांकडून परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना विविध सूचना केल्या. गर्दीच्या नियोजनासाठी स्वयंसेवक, समता सैनिक दल यांना सोबत घेऊन व्यवस्थापन करण्यात आले आहे.
विविध कार्यक्रमांची रेलचेल
विद्यापीठाच्या नाटयगृहात बुधवारी सकाळी १०:३० वाजता राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या वार्षिक परिक्षेतील प्रथम आलेल्या गुणवतांना २५ सुर्वणपदकांचे वितरण होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंडेंनी दुसरी पत्नी, अपत्य व त्यांच्या खर्चाबद्दल माहिती लपवल्याने आमदारकी रद्द होणार ?
- कृषी कायदे स्थगितीचा नांदेडमध्ये जल्लोष
- ‘मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी आपल्या बहिणीने केलेल्या आरोपावर का बोलत नाहीत
- ‘बर्ड फ्लू’च्या धर्तीवर औरंगाबाद महापालिका सज्ज