Facebook- फेसबुक मॅसेंजरची लाईट आवृत्ती

फेसबुक मॅसेंजरवर नवनवीन सुविधा देण्यात येत असतांना आता भारतीय युजर्ससाठी याची लाईट आवृत्ती सादर करण्यात आली आहे. जगातील आधुनिक राष्ट्रांमध्ये इंटरनेटचा वेग चांगला असला तरी भारतासारख्या देशांमध्ये अजूनही समाधानकारक वेग नसल्याची बाब उघड आहे. या पार्श्‍वभूमिवर भारतीय युजर्सला अधिक गतीमान पध्दतीने स्मार्टफोन अ‍ॅप वापरता यावे म्हणून अनेक कंपन्यांनी आपापल्या लाईट आवृत्त्या सादर केल्या आहेत. यात फेसबुक, ट्विटर, स्काईप आदींचा समावेश आहे. यात आता फेसबुक मॅसेंजरची भर पडली आहे. या अ‍ॅपचा आकार अवघा १० मेगाबाईट इतका असून संथ इंटरनेट असतांनाही ते पुर्णरित्या काम करू शकते. याच्या मदतीने मॅसेंजरचे सर्व बेसिक फंक्शन्स म्हणजेच संदेश/प्रतिमा/लिंक्स/इमोजी वा व्हिडीओंचे आदान-प्रदान शक्य आहे. ही आवृत्ती अँड्रॉइड युजर्ससाठी सादर करण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...