‘१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे’

टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. २१ दिवसाचे हे लॉक डाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. परंतु देशभरातील कोरोनाच्या नवीन केसेस थांबत नसल्याने हा कालावधी अजून वाढवण्यात येईल अशी चर्चा आहे.

आता स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी १४ एप्रिलला देशातली लॉक डाऊन संपल्यानंतर महानगरं आणि काही बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागाला त्यातून वगळण्यात यावं, अशी मागणी केली आहे.

टाळेबंदी अर्थात लॉक डाऊनचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे. द्राक्षं, आंबे, पपई, भाजीपाला आणि दूध हे बाजारपेठांपर्यंत न पोहचवता आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली साखळी अबाधित असल्याचा दावा सरकारने केला असला तरीही ते वास्तव नसून वस्तुस्थिती वेगळी आहे, असंही राजू शेट्टी यांनी म्हणाले .

ग्रामीण भागात १४ एप्रिलनंतर सरकारने टाळेबंदी उठवावी अशी आमची मागणी आहे. कारण खेड्यांमध्ये कोरोनाचा फार प्रसार झालेला नाही. गावाकडची माणसं जी मुंबई आणि पुण्यात वास्तव्य करत होती ती ज्यावेळी आपल्या गावी परतली तेव्हा त्यांना सक्तीचे क्वारंटाइन ठेवण्यात आलं आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.

हेही पहा –