मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना वैफल्य आलं आहे. त्यामुळे ते जुन्या गोष्टींना उजाळा देत आहेत. भाजपला कधीच सत्तेची लालसा नव्हती. आम्हाला सत्तेची हाव असती तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं नसतं, असं सांगतानाच भाजपचा जीव सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यात आहे.
मुंबई महापालिका कुणाची जागीर नाहीये. भाजपचा जीव मुंबई महापालिकेत आहे. कारण मुंबईकरांना सुविधा मिळत नाही. 25 वर्ष तुमचा जीव महापालिकेत होता. आता तुमचा जीव जरा बाजूला ठेवा. बघा महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल. महापालिकेत आमचीच सत्ता येईल, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील अनेक मुद्दे त्यांनी खोडून काढले.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Jadhav : रामदास कदम कालपर्यंत मराठा नव्हते का?; संजय जाधव भडकले
- Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : “आज तुमचा वाढदिवस आहे, उद्या…” ; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर शिंदे गटाची प्रतिक्रिया!
- Bhai Jagtap | तब लडे थे गोरोसे अब लडेंगे चोरोसे – भाई जगताप
- Chandrakant Khaire : रामदास कदमांना मराठा नेत्यांवरून समाजात तेढ निर्माण करायचाय, चंद्रकांत खैरेंच वक्तव्य!
- Ramdas Kadam : आदित्य ठाकरेंना स्वत:चं खातं राहिलं बाजूला इतरांची खाती सांभाळायची आहेत; रामदास कदमांचा गंभीर आरोप
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<