आयुर्विमा उतरवणे इस्लाममध्ये हराम

टीम महाराष्ट्र देशा- आयुर्विमा पॉलिसी काढणे किंवा संपत्तीचा विमा करणे गैर इस्लामिक आहे. संपत्ती किंवा व्यक्तीचा विमा काढणे किंवा उतरवणे दोन्हीही इस्लाम विरोधात आहे, असा फतवा उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील दारूल उलूम देवबंदच्या उलेमांनी जारी केला आहे. या फतव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गाझियाबादच्या एका व्यक्तीच्या प्रश्नाला दारूल उलूमने उत्तर दिले आहे की, विमा कंपन्या मनुष्याचे जीवन वाचवत नाहीत. त्यामुळे फक्त अल्लाहवर विश्वास असला पाहिजे. विमा कंपन्या त्यांना मिळालेला पैसा विविध ठिकाणी गुंतवतात. त्यातून मिळालेला फायदाच विमा धारकांमध्ये वाटला जातो. त्यामुळे या माध्यमातून जी काही रक्कम मिळते ती व्याजावर आधारित असते आणि व्याज हे इस्लाममध्ये हराम आहे.