उस्मानाबादेतील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द, कारण…

उस्मनाबाद : येथील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय रिझर्व बँकेने घेतला आहे. बँकेला वसुली आणि अन्य कामकाजात सुधारणा करण्याची संधी देऊनही सुधारणा केल्याने रिझर्व बँकेने ही कारवाई केली आहे. तब्बल ४५ कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या बँकेवर ही अंतिम कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. वसंतदादा बँक मागील काही दिवसांपासून अडचणीत आली होती.

रिझर्व बँकेने २०१७ साली लक्ष घालून नव्या ठेवी स्वीकारण्यावर बँकेवर निर्बंध घातले होते. त्याचबरोबर थकबाकीदारांकडून येणी वसूल करून त्यातून ठेवीदारांच्या रकमा परत करण्यास सांगितले होते. तीन वर्षाच्या कालावधीत यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. आता ही बँक ठेवीदारांच्या रकमा परत करण्यास असमर्थ असल्याचा दावा करीत रिझर्व्ह बँकेने लायन्संस रद्द करून पुढील कोणतेही व्यवहार करण्यावर निर्बंध आणले आहेत.

तसेच सहकार विभागाला बँकेवर तातडीने अवसायक नेमून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. वसंतदादा नागरी सहकारी बँकेवर सह्यक निबंधक विकास जगदाळे यांची नेमणूक केली आहे.

महत्वाच्या बातम्या
जिल्हाधिकारी म्हणतात, “बिनधास्त मारा चिकनवर ताव”
औरंगाबादेच्या लसीकरण केंद्राचे मोंदीच्या हस्ते होणार उद्घाटन
कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेची, मात्र पालकमंत्री राजकीय फायदा घेण्यात व्यस्त ?
मुंडे प्रकरणावर सत्तार म्हणाले, “प्यार किया तो डरना क्या?”
मुंडेंनी दुसरी पत्नी, अपत्य व त्यांच्या खर्चाबद्दल माहिती लपवल्याने आमदारकी रद्द होणार ?