fbpx

Yes! We Are Bisexual; आपल्या हक्कासाठी पुण्यात संमपंथीयांची परेड

पुणे: कलम ३७७ हे अन्यायकारक असून आम्हाला देखील सन्मानाने जगण्याचा हक्क असल्याचा नारा देत आज पुण्यामध्ये संमपंथीयांच्या परेडच आयोजन करण्यात आले होते, यावेळी पुणे, मुंबई तसेच राज्यातील इतर शहरातून आलेले तृतीयपंथी, समलैंगिक या रॅलीत सहभागी झाले झाले होते.

देशभरात आजही संमपंथीयांना वेगळ्या नजरेन पाहिलं जात त्यामुळे खुलेआमपणे वावरणे देखील अवघड होत असल्याची खंत यावेळी अनेक संमपंथीयांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना व्यक्त केली आहे. यावेळी नका करु दुजेपणा, तृतीयपंथी, समलैंगिकांना आपले म्हणा, 377 कलम रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या.LGBT Pride 2018 pune

संमपंथीयांसाठी काम करणाऱ्या समपथिक या संस्थेच्या वतीने या परेडच आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या वेशभूषा केलेले संमपंथीय यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. समाजामध्ये वेगळ्यानजरेने पाहिलं जात असताना देखील पुण्यातील रस्त्यावर उतरलेल्या या समुहाने आपणही सर्वाप्रमाणे सामन्य व्यक्ती असल्याच दाखवून दिले. एलजीबीटीच्या हक्कासाठी मागील ७ वर्षापासून ही पदयात्रा काढण्यात येत आहे. यंदाचे हे आठवे वर्ष आहे.