600 शिक्षणतज्ज्ञांचं पंतप्रधानांना पत्र!

narendra modi

वेब टीम – जगभरातल्या 600 शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी देशातल्या गंभीर प्रश्नांवर मोदींच्या गप्प राहण्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

पत्रात असे लिहिले आहे की, सध्या देशात परिस्थिती गंभीर आहे. त्यात भरीसभर म्हणून सत्तारुढांचा हिंसेशी असलेला परस्परसंबंध निर्विवादपणे उघड होताना दिसत आहे. पण, यावर तुम्ही बराच काळ मौन साधलं आहे. त्याचं कारण काय?, असा प्रश्न मोदींना उद्देशून विचारण्यात आला आहे. या पत्रावर न्यूयॉर्क विश्वविद्यालय, ब्राऊन विश्वविद्यालय, हार्वर्ड, कोलंबिया येथील विद्यापीठं तसेच वेगवेगळ्या आयआयटी संस्थांच्या शिक्षण तज्ज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.