मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अजय देवगण (Ajay Devgn) हा आहे. त्याने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र सिनेसृष्टीतील करिअरच्या सुरुवातीस त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. नुकतच सोशल मीडियावर अजय देवगणने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वत:चा उल्लेख करत स्वत:ला (himself) पत्र लिहिले (wrote a letter) असून त्यातील मचकूर वाचून चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर अजय देवगण बऱ्यापैकी सक्रिय असतो. ५२ वर्षीय अजय देवगणने २० वर्षांच्या अजय देवगणसाठी म्हणजेच स्वत:लाच एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये करिअरच्या सुरुवातीला त्यास बऱ्याच चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, डान्स शिकण्याची गरज असल्याचा सल्ला देण्यात आला होता अशा अनेक गोष्टींचा उल्लेख अजयने त्या पत्रात केला आहे.
तसेच “ एक अभिनेता असल्यामुळे या जगात तुम्ही स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करत असता. मी इमानदारीने सांगेन की तुला अनेक नकार झेलावे लागले. अनेक प्रयत्न करुन तू इथे फिट होण्याच प्रयत्न करत राहिलास. मात्र कधीकधी अपयश (fail) देखील येते. तू जेव्हा अभिनेता म्हणून अपयशी होशील तेव्हा लोक तुझ्यावर टीका करतील, संशय घेतील या सर्व गोष्टींचा सामना करणे कठीण आहे. कदाचित तुलाही तुझ्या स्वप्नांवर शंका वाटेल. तरी देखील एक दिवस तुला जाणवेल की मी जसा आहे तसाच रहायला हवे. त्यामुळे कधीही थांबायचे नाही” या आशयाची पोस्ट अजय देवगणने शेअर केली आहे.
दरम्यान अजय देवगणने ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलीवूडमध्ये गेल्या ३१ वर्षांपासून अजय बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. दिग्दर्शक वीरु देवगणचा मुलगा असून त्यांनी अनेक चित्रपटांमधले अॅक्शन सीन केले आहेत. त्या अॅक्शनची आजही चाहत्यामध्ये चर्चा होत असते.
महत्वाच्या बातम्या:
- धर्मामुळे कुशल टंडनसोबत ब्रेकअप केलं म्हणणाऱ्यांना गौहर खानचं सडेतोड उत्तर
- आता सर्व दुकानांवर मराठी पाट्याच; राज्य सरकारचा मोठा निर्णय
- औरंगाबादकरांनो सावधान; कोविड नियमांचे उल्लंघन करणे पडणार चांगलेच महागात..!
- ‘…बोलताना जरा विचार करा’; धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात पुन्हा वाद
- धक्कादायक! औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही..
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<