fbpx

एटीएसवर युवकांचा छळ करत असल्याचा आरोप, सनातनच्या वकिलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम महाराष्ट्र देशा – सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव राऊत सह इतरांच्या झालेल्या अटकेप्रकरणी एटीएसवर गंभीर आरोप केले आहेत. यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात एटीएस या युवकांचा छळ करत आहे. मालेगाव सारखा प्रकार या युवकांच्या बाबतीत होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित वैभव राऊत कडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून काल संध्याकाळी दोघांना अटक केली होती. या प्रकरणाची व्याप्ती आज वाढली असून सकाळी केलेल्या कारवाईत पुण्यातून आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातून एकूण 12 जणांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान,नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक होते तर सनातनचे वकील पुनाळेकर जे बॉम्बस्फोटातल्या आरोपींच खूलेआम समर्थन करतात त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

संविधान जाळल्याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी पेटवली मनुस्मृती

भाजपच्या डोकेदुखीत वाढ ; अजून एक मोठा मित्रपक्ष नाराज