अजितदादा कशाला हसं करून घेताय… !

postcard ajit dada pawar by govind wakde ibn lokmat reporter 1

प्रिय, अजितदादा नमस्कार …
पत्रास कारण की, पुन्हा एकदा आपण दर्शन देऊन जाणार आहात म्हणे, ते आले त्यांनी पाहिले आणि ते गेले… हल्ली एव्हढच काय ते वर्णन आपल्या दौ-याबाबत केल जातं आणि ते सत्यही आहे म्हणा. बाकी आपण आपलं वेळात वेळ काढून शहरात येतायत हे मात्र उन्हाळ्यात अचानक पाउस यावा तसं आहे बर, पण थोड़ा वेळ ओलावा-तजेलपणा निर्माण करणारा पाऊस, नंतर मात्र घामच फोड़तो (कसा, ते आपले स्थानिक नेते -कार्यकर्ते मंडळी जास्त चांगल सांगू शकतील)
तर ह्या वेळी  हल्लाबोल का कसल तर आंदोलन करातायत म्हणे तूम्ही.. मागच्या नोव्हेंबर महिन्यात हाहाकार आंदोलन, आणि आता हल्ला बोल…!!
चांगल आहे…
पण प्रश्न हा आहे की, हे आंदोलन सरकार विरोधात असेल तर ते इथे करून काय उपयोग हो दादा….!!
ते मुंबईत करायला हवं होतं, बर जर समजा हा हल्लाबोल आंदोलन राज्यभर सुरु आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून तूम्ही दोन सभा इथे घेतल्या, अस म्हणत असाल तरीही उपयोग नाहीय बर..!!
कारण इथे तर आपल्या शिलेदारांनी स्वतःची तोंड शिवली आहेत, तशी मोठ- मोठी होर्डिंग्सही त्यांनी शहरभर लावली होती. त्यामुळे ते मुके झालेयत आणि आमच म्हणाल तर असले भारी सत्ताधारी निवडून दिल्यामुळे आम्ही आधीच दिवस-रात्र स्वतःच थोबड़ झोडुन घेतोय, त्यामुळे सुजलेल्या तोंडान आम्हीही बोलू शकणार नाही.

Loading...


असो….. हे तुम्हालाही माहीत आहे म्हणा मी सांगून तर काय उपयोग शेवटी तुम्ही जे पेरल, तेच उगवतय नाही का?
पण, आलात तरी कृपया शहरातील प्रश्नांवर उगाच गळा काढू नका, ही विनंती..
कारण, अधिवेशनात तर शहराच्या प्रश्नावर तुम्ही मुग गिळली होती, मग इथे बोलून ऊगाच मनोरंजन कशाला करता. बाकी तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या नेत्यांच्या छात्या फुगतात त्यांना ऊर्मी वगैरे येते अस तुम्हाला वाटत असेल तर तेही खोट आहे बर, कारण तुम्ही शहरातून गेले की लगेच तुमचे म्हंणविणारे सगळे सत्ताधा-याच्या कुशीचा आसारा घेतात आणि त्यामुळे तुम्हाला नैतीकतेच्या गप्पाही मारता येणार नाहीयत.

दादा ,एक वेळ तुम्हाला पालिकेतील पराभव परवडेल हो, पण एकीकडे सत्ताधाऱ्याना भ्रष्टाचारी म्हणायच आणि दुसरीकडे ते जे  खातात त्याच्यात सहभागीही व्ह्ययच, हे मात्र तुमची असली नसली तेवढी अब्रु घालविण्याचा प्रकार आपली लोक इथे करतायत. नाही म्हणायला तुमच्यातील काही शिलेदारानी इथे काम केलीयत, पण त्यासाठीही त्यांना शिवसेनेच्या कुबड्याचा आधार घ्यावा लागला , ज्यामुळे पाणी पट्टी दरवाढ मागे घेतल्या गेली आणि दूसर काय तर कचऱ्याची एक निविदा थांबलीय. पण पुढे काय? हां प्रश्न अनुत्तरित आहे बर तो सुटला तर बरं, नाही तर असही जनतेंन तुमच्या पाठी येणं सोडल आहेच..

दादा, खरतर एव्हढं बोलन्या मागची एकच खदखद आहे आणि ती म्हणजे आपण ज्यांची-ज्यांची शिलेदार म्हणून निवड केली ते सगळे सत्ताधाऱ्यांच्या डेरे दाखल झाले आहेत आणि उरलेले सगळे त्यांच्याशी उघडपणे हात मिळवणी करतायत, त्यामुळेच एका बापाची अवलाद असाल तर भ्रष्टाचार सिद्ध करा,  ह्या सत्ताधाऱ्यांकडून केल्या गेलेल्या अत्यंत हीन आह्वानाचाही तुमच्या बुझगावन्यांवर काही फरक पड़ला नाही आणि तूम्ही म्हणतायत तूम्ही लोक आमचे प्रश्न सोडवणार …? पद भूषविणे वगैरे काय असते हे आम्हाला माहीत नाही पण फारच पुळका आला असेल तर पालिकेतील बसवलेल्या आपल्या 33 च्या 33 नगर सेवकांना दया म्हणाव राजींनामे फेकून, एक प्रयोग तर बघूया विरोधकां शिवाय सभागृह चालत तरी कस…! कारण असही सभागृहात बोलून उपयोग नाही, बहुमताने सर्व विषय मंजूर केले जातातच की, मग तुमच्या सभागृहात असण्याचा उपयोग तरी काय हो? पण ते होणार नाही, कारण तूम्ही सगळे एकाच माळेचे मणी आहेत न..!!

आज शहरातली दीड लाख बांधकाम अनधिकृत ठरली आहेत, त्यांच्यावर कारवाई होण्याची टांगती तलवार कायम आहे, ज्या वेळेस तुमची सत्ता होती, त्याच वेळेस आपल्या नगरसेवकांनी बांधकाम करण्यासाठी नीट परवानग्या दिल्या असत्या तर ना, ही बांधकामे अनधिकृत ठरली असती ना, त्यावर शस्तिकर लागला असता
ना, तुमची सत्ता गेली असती, आणि ना, तुमच्यावर असा हल्ला-बोल करण्याची वेळ आली असती…
त्यामुळे ह्या प्रश्नाच् मूळही आपणच आहत हो, पण तरीही तुम्ही आणि तुमच्या चेल्यांमध्ये बराच फरक आहे आणि म्हणून तुम्हाला हे पत्र लिहोतोय बर..!!

पिंपरी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मागील एक वर्षात घातलेला नाच, थेट पंतप्रधान कार्यालयात जाऊंन पोहचला,
गगनचुंबी बजेट आणि रकमेची आकड़े पाहुन डोळे दिपले, अनेक निविदांच्या चौकशी लागल्या, एवढंच काय तर स्वत:सत्ताधाऱ्यानीच पाईप लाइन दुरस्तीसाठीच्या काढलेल्या कामाच्या चौकशीची मागणी केली, अनेक ब्लैक लिस्टेड ठेकेदार भ्रष्टाचार शुद्ध  करतायत, शहरातील काम वाटून घेण्यासाठी शहराचे दोन भाग करण्याचा समझोता करार  ही झालाय आणि कधी नव्हे ते अर्धा डझनहुन जास्त अधिकारी, कर्मचारी त्यांचे बगल बच्चे लाच-लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेत.. शहरातील दवाखाने सभागृह तयार आहेत पण ती धुळखात पड़लियत, मेडिकल कॉलेज वगैरे होईल पण डॉक्टर भरती प्रक्रिया थांबलीय , दर दिवशी शहरातील किमान 11 माणसांची मोकाट कुत्रे लचके तोड़तायत, तर शहरातली गावगुंड शहरात रोज खून पड़तायत, अब्रु लुटली जातीय आणि पोलिस यंत्रणा मटके अड्डे चालवतीय .. आणि हे सगळ उघड डोळ्यांनी पारदर्शक पणे पाहणासाठी आपला सारा वेळ सार्थकी लावणाऱ्या सत्ताधार्यांकडून, आमचे प्रश्न सूटतील अशी सुतराम शक्यता नाहीये..
बाकी, राहिला प्रश्न आमच्या जगण्याचा,
तर आम्ही दिवसभर चर्चा करतो,
अन् संध्याकाळी शहरातील नदया प्रदूषित झाल्यामुळे वाढलेले मच्छर मारत बसतो.

आणि म्हणून आम्ही तर आमच हसं करून घेतलच आहे ,
पण अस वागुन तुम्ही तुमच हसं का करून घेताय हो दादा…!!

-गोविंद वाकडे ( पत्रकार )Loading…


Loading…

Loading...