पुणे : कुचिक प्रकरणातील पिडीतीने चित्रा वाघ यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनी मला आत्महत्येचं पत्र लिहायला लावलं,यांच्या लोकांनीच माझं अपहरण केलं. असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांच्यावर पिडीतेने केला आहे.
चित्रा वाघ यांनी मुंबईत पहिली पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा मला चित्रा वाघ यांच्या लोकांनी लीलावती हॉस्पिटलच्या जवळच्या हॉटेल मध्ये जबरदस्ती ठेवले होते. माझा मोबाइल काढून घेतला व मला यानंतर थेट पत्रकार परिषदेत उभं केलं होत. त्यावेळी मला काहीच बोलायचं नव्हत पण चित्रा वाघ यांनी मला जबरदस्ती बोलायला लावलं, असा गंभीर आरोप पिडीतेने केला.
चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “रघुनाथ कुचिक प्रकरण पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले. खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही असे ही अनुभव येतात. फेब्रुवारी पासून एकटी लढणाऱ्या या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात तिने बोलताचं सगळे एकत्र तिच्या मदतीसाठी आलेत याचा आनंद वाटला. मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे. मला राज्यातल्या मायमाऊलींना सांगायचंय काही अडचण असेल संपर्क करा जी मदत आम्हाला करता येईल ती आम्ही नक्की करू व करत राहू, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या –