खडसेंचा व्यवसाय शेती मग इतकी संपत्ती कशी ?

भाजप आमदाराच्या लेटरहेडवरून हायकोर्टाच्या न्यायाधीशांना पत्र

जळगाव : भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशांना पाठवण्यात आलं आहें, यामध्ये खडसेंचा मुख्य व्यवसाय शेती आहे, मग एवढी संपप्ती कोठून आली, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे पत्र भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडवर पाठवण्यात आलं आहे.

भोसरी येथील भूखंड प्रकरणामुळे आधीच एकनाथ खडसे यांना आपल महसूल मंत्रीपद सोडाव लागलं होत, या प्रकरणी खडसेंना एसीबीकडून क्लीन चीट देण्यात आली आहे, त्यानंतर आता पुन्हा नव्याने त्यांच्या संपत्तीवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारे पत्र हायकोर्टाच्या न्यायाधीशांना पाठवण्यात आल्यानं चर्चांना उधान आल आहे.

दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या लेटरहेडचा गैरवापर झाल्याची तक्रार जळगाव पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तसेच एकनाथ खडसे आणि आपल्याला बदनाम करण्यासाठी कोणीतरी खोडसाळपणा केल्याच भोळे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठवाड्यातून होणार आणखीन एका ठाकरेंची एन्ट्री

भाजप सोडणार नाही; पण मंत्रिपद नकोच – एकनाथ खडसे

You might also like
Comments
Loading...