‘मूळ भाजपचे म्हणून किती कुरवाळायचे’; पुणे भाजपमध्ये पुन्हा एकदा लेटर बॉम्ब

bjp pune letter bomb stroy

पुणे: पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पालिकेत 162 पैकी तब्बल 98 नगरसेवक हे भाजपचे आहेत. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून येण्यात ज्या नेत्याच्या हाथ आहे त्यांनाच पक्षात दुय्यम स्थान दिल जात असल्याने त्यांचे समर्थक नगरसेवक चांगलेच खवळल्याच दिसत आहे. ती व्यक्ती म्हणजे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे. सत्ता आल्यापासून काकडे समर्थकांना ‘अच्छे दिन’ येण्या ऐवजी प्रत्येक ठिकाणी दुय्यम स्थान दिल जात असल्याचा आरोप करणारे एक निनावी पत्र अनेक नगरसेवकांना पोस्टाने प्राप्त झालं आहे. यामध्ये पालकमंत्र्यासह सर्व आमदार आणि पालिकेतील पदाधिकाऱ्यांचे अक्षरश वाभाडे काढण्यात आले आहेत.

महापालिकेत संजय काकडे समर्थकांना टार्गेट करून कमी निधी दिला जातो. अनेक नगरसेवकांची विनाकारण बदनामी केली जाते. काकडेंना कोणत्याच मोठ्या निर्णयात विचारत घेतलं जातं नसल्याचं आणि अनेक मुद्दे या पत्रामध्ये लिहिण्यात आले आहेत. या निनावी लेटरबॉम्बने पुन्हा एकदा भाजपच्या गोटात खळबळ माजवली आहे. पूर्वीही असेच एक पत्र अनेक नगरसेवकांना पाठवण्यात आले होते.

संबंधित पत्र:

letter bomb pune corporation 000

letter bomb pune corporation 000

letter bomb pune corporation 0001

letter bomb pune corporation 000

letter bomb pune corporation 000

letter bomb pune corporation 000

letter bomb pune corporation 000

letter bomb pune corporation 000

सध्या सोशल मीडियावर हे पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. दरम्यान याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी भाजप नेत्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही.